भिलवडी जिल्हा परिषद गट निर्णायक टप्प्यावरती.. - Palus Kadegaon News

Breaking

Monday, February 2, 2026

भिलवडी जिल्हा परिषद गट निर्णायक टप्प्यावरती..

 



भिलवडी: वार्ताहर 


भिलवडी जिल्हा परिषद गटांमध्ये काँग्रेस विरोध भाजप अशी लढत होत असून दोन्ही पक्षांनी मातब्बर उमेदवारांना मैदानामध्ये उतरवल्याने निवडणूक लक्षवेधी ठरत आहे.

मागील काळात माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांनी विक्रमी ६० कोटी रुपयाची विकास कामे जिल्हा परिषद गटामध्ये खेचून आणली आहेत. 

मागील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे स्व.संग्राम पाटील यांचा ७७ मतांनी पराभव करत सुरेंद्र वाळवेकर यांनी विजय मिळवला होता. काँग्रेसचे संग्राम पाटील यांच्या पराभवाचा वचपा घेण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी संग्राम पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांना उमेदवारी देत मैदानामध्ये उतरवले आहे. तर भाजपने उच्चशिक्षित प्राध्यापक डॉ. महेश पाटील यांना मैदानामध्ये उतरवले आहे डॉ.महेश पाटील यांना भाजपने उमेदवारी दिल्यामुळे परिसरामध्ये उच्चशिक्षित संवेदनशील व्यक्तिमत्व राजकारणामध्ये सक्रिय झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमधून पाठिंबा वाढताना दिसत आहे. प्राध्यापक डॉ.महेश पाटील यांनी जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या मोलाचे मार्गदर्शन केले असून ही त्यांची जमेची बाजू आहे.

सुरुवातीला काँग्रेससाठी एकतर्फी मानली जाणारी निवडणूक सध्या निर्णायक टप्प्यावरती पोहोचली आहे.

भाजप - काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांनी प्रचाराच्या तोफा एकमेकांवरती शिंतोडे न उडवता विकास कामाभोवती निवडणूक केंद्रित केली आहे. 

गाव गाड्यातील राजकीय तीड्याच्या खेळी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असून जिल्हा परिषद गटामधील दहा गावे कोणत्या उमेदवाराच्या पारड्यामध्ये झुकतं माप देतात हे मतमोजणी नंतरच स्पष्ट होईल.

No comments:

Post a Comment