भिलवडीत काँग्रेस नेत्यांचा भाजप प्रवेश.. - Palus Kadegaon News

Breaking

Friday, January 30, 2026

भिलवडीत काँग्रेस नेत्यांचा भाजप प्रवेश..

 


भिलवडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच मोहन तावदर व ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य विष्णू कांबळे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला.


भिलवडी जिल्हा परिषद गटातील भाजप उमेदवार डॉ.महेश रंगराव पाटील सर, पलूस पंचायत समिती उमेदवार सुनीता शिवाजी गायकवाड यांच्या प्रचारासाठी माळवाडी येथे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, क्रांतीअग्रणी डॉ.जी डी (बापू) लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला येत्या काळात भारतीय जनता पार्टीच्या बळकटीसाठी प्रचंड काम करणार असल्याचे मोहन तावदर व विष्णू कांबळे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना भावना व्यक्त केली. 

No comments:

Post a Comment