खटावच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी: संग्राम देशमुख - Palus Kadegaon News

Breaking

Tuesday, January 21, 2025

खटावच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी: संग्राम देशमुख



 भिलवडी: वार्ताहर 

खटावच्या विकासासाठी दोन कोटीचा निधी मंजूर असून गावच्या परंपरेनुसार स्व. आनंदराव पाटील यांच्या विचाराचा वारसा त्यांचे कुटुंबीय चालवत आहेत, याच कौतुक आहे. ४० वर्षे प्रलंबित असणाऱ्या कुरण रस्त्याचा प्रश्न सोडवल्याच समाधान ग्रामस्थांमधून दिसत आहे.

 यापुढेही खटावच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल, असे मत जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी व्यक्त केल.



 खटाव येथील ब्रह्मनाळ रस्ता ते कुरण भाग रस्ता कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. रस्ते कामाचे भूमिपूजन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी २५/१५ योजने अंतर्गत ६० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी विश्वजीत पाटील, धोंडीराम जंगम, मधुकर यादव, प्रभाकर साळवी, ग्रा.पं. सदस्य सुविधा चौगुले, महालिंग मंडले, दत्ता उथळे, संग्राम पवार, सचिन पाटील, शीतल लोटे, श्रीकृष्ण विसापूरकर, संजय पाटील, रणजीत पाटील, सागर चौगुले, अंकुश सावंत यांच्यासह कुरण भागातील सर्व शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.


खटाव येथील कुरण रस्त्याचे भूमिपूजन करताना संग्राम देशमुख, विश्वजित पाटील व मान्यवर.




No comments:

Post a Comment